

Medical tourism growth in India
sakal
पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले आहेत. पाश्चात्त्य देशांशी बरोबरी करता येईल असे तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच जागतिक पातळीच्या वैद्यकीय सेवा देणारे अद्ययावत रुग्णालये देखील आहेत. मात्र, वैद्यकीय पर्यटन (मेडिकल टुरिझम) बाबत आपल्याकडे पुरेशी जागरूकता नव्हती. या अर्थसंकल्पात मेडिकल टुरिझम ला चालना देण्याच्या घोषणेच्या निमित्ताने जागरूकता वाढेल व नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच, कर्करोगाच्या औषधांमध्ये आयात शुल्क कमी केल्याने गरीब व मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल, अशा प्रतिक्रिया आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निमित्ताने दिल्या.