Pune Traffic: ''दि पूना चेंबरचं सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान'', मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन

Nitin Gadkari Pune Ring Road project update : पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठा रिंगरोडच्या परिसरात स्थलांतरित करा, असा महत्त्वपूर्ण सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांना 'आदर्श व्यापारी' पुरस्कार वितरण सोहळ्यात दिला आहे.
Nitin Gadkari Pune Ring Road project update

Nitin Gadkari Pune Ring Road project update

esakal

Updated on

पुणे : पुण्याच्या शेजारून रिंगरोड केले जात आहेत, या रिंगरोडच्या शेजारी व्यापार, उद्योगांसाठी जागा आरक्षीत करून ठेवा. शहरातील बाजारपेठ त्या भागात स्थलांतरित झाल्यानंतर पुण्‍यातील वाहतूक कोंडी, प्रदूषणाचा प्रश्‍न कमी होईल. लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकते. मी नागपूरमध्ये हे करून दाखवले आहे, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजूषा नागपुरे यांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com