...अन् दोन गुण कमी मिळाले; प्रकाश जावडेकरांनी सांगितल्या शिक्षकांविषयीच्या आठवणी!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

- 'आई'च होती शिक्षिका
- शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांबद्दलच्या भावना
 व्हिडीओद्वारे पोस्ट

पुणे : "जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असताना आई हीच शिक्षिका होती. एकदा इयत्ता चौथीतील पेपर शिक्षिका असलेल्या माझ्या आईकडे तपासणीसाठी आले. तिने पूर्ण पेपरचे आकलन केले, पण तिने काही दाखविले नाही. त्यानंतर वर्गात पेपर मिळाले आणि त्या पेपरमध्ये मला दोन गुण कमी मिळाल्याचे दिसून आले. मग मी घरी येऊन आईशी भांडायला लागलो. 'तुम्ही दोन गुण कमी का दिले?' असे विचारले.

त्यावर आईने "मी जाणून बुजूनच दोन गुण कमी दिले. कारण आईच शिक्षिका आहे, म्हणून मुलाला ज्यादा गुण मिळाले, असे कोणी म्हणायला नको," असे सांगत समजावले. हेच तर संस्कार आणि हीच आपली संपत्ती आहे," असे अनुभव सांगत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षक दिनी आपल्या जीवनातील शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला.

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!​

शिक्षक दिनाचे औचित्य साधून जावडेकर यांनी एक व्हिडीओ यू-ट्यूबवर पोस्ट केला आहे. तसेच त्यासंदर्भात ट्वीट देखील केले आहे. त्यात त्यांनी शिक्षकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. "प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक असतात. मी शिक्षण मंत्री झाल्यावर, पुण्यात आलो. त्यावेळी कार्यकर्ते मोठी मिरवणूक काढणार होते, पण मी त्याला नकार दिला. त्याऐवजी पुण्यातील एका महाविद्यालयात 'गुरूप्रणाम' हा कार्यक्रम घेतला.

कोरोनाला आळा घालण्यासाठी शरद पवार मैदानात; पुण्यात घेतल्या बैठकांवर बैठका!​

महाविद्यालयीन जीवनात असणाऱ्या सर्व प्रमुख शिक्षकांना बोलाविले आणि या कार्यक्रमात त्यांना सन्मानित केले. मग संसदेतही ४०पेक्षा जास्त प्राध्यापक असल्याचे लक्षात आले. संसदेच्या प्रांगणात बोलावून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले होते," असे अधोरेखित करत जावडेकर यांनी आठवणींना उजाळा दिला. शिक्षक दिनानिमित्त आपणही आपल्या शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Prakash Javadekar told memories of teachers on Teachers Day