

Importance of soil health management in Indian agriculture
Sakal
माळेगाव : "मातीचे आरोग्य जपणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने भारत सरकारच्या कृषि मंत्रालय अंतर्गत भारतीय कृषि संशोधण परिषद नवी दिल्ली या संस्थेसह देशातील कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, राज्य सरकारचा कृषि विभाग आणि कृषि विद्यापीठा मार्फत 'शेत वाचवा अभियान' राबविले जात आहे, त्या उपक्रमाला सर्वत्र शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे," अशी माहिती केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी बारामतीत दिली.