Union Secretary Dilip Kumar
sakal
दावडी - पाणलोट विकासाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविण्याच्या उपाययोजनांमुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीला नवी उभारी मिळाली आहे. भूजल पातळीत सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना पूर्वी दोन पिकांऐवजी आता तीन पिके घेणे शक्य होत आहे. या कामांची शुक्रवारी (ता. ३०) रोजी केंद्रीय भूमी संसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार यांनी पाहणी केली. प्रकल्पांतर्गत झालेली कामे समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.