मस्तच! घरीच विज्ञान प्रयोगांची मुलांना अनोखी संधी

पुणे : प्रयोग करताना शालेय विद्यार्थीनी.
पुणे : प्रयोग करताना शालेय विद्यार्थीनी.
Updated on: 

पुणे - लहान मुलांना आवडतील आणि समजतील असे विज्ञान प्रयोग ‘संडे सायन्स स्कूल’तर्फे पाठविलेल्या संचांमधून करून पालक आता मुलांना विज्ञानाचा मनोरंजक अनुभव देऊ शकणार आहेत. ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने आठ आठवडे चालणाऱ्या विज्ञान प्रयोगांच्या या उपक्रमात ६ ते ८ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या उपक्रमामध्ये प्रयोग संच कुरिअरच्या मदतीने मुलांना घरपोच मिळणार आहेत. व्हिडिओ व ऑनलाइन पद्धतीने या प्रयोगांची माहिती मराठी व इंग्रजी भाषांमधून दिली जाईल व घरातूनच पालकांच्या मदतीने मुले हे प्रयोग करतील.

पुण्यामध्ये २०११ पासून तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कृतिशील प्रयोग वर्ग चालविले जातात. पालकांच्या आग्रहास्तव व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता रविवारपासून (ता. १३) नवीन कृतिशील अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. घरातील साहित्यापासून करता येणाऱ्या विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक रविवारी सर्वांना पाहता येईल. शेवटी सर्वांना डिजिटल प्रमाणपत्रही मिळणार आहे. विज्ञानातील संकल्पना स्पष्ट होण्याबरोबरच प्रयोगातून विज्ञानातील गमती मुलांना अनुभवता येतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

  • आठ प्रयोग संच व २५ हून अधिक प्रयोग
  • प्रयोगासाठीचे साहित्य व कुरिअर खर्चासह १८५० रुपये शुल्क 
  • प्रवेश किंवा रविवारच्या कार्यक्रमाची यू-ट्यूब लिंक मिळविण्यासाठी  ९६०७२०८५५२ या क्रमांकावर विद्यार्थ्याचे नाव व इयत्ता लिहून व्हाॅट्‌सॲप मेसेज करावा
  • नावनोंदणी संपर्क - ९६०७२०८५५२/ ९३७३०३५३६९

काय आहे अभ्यासक्रमात
मॅग्नेटिक कार, स्टेथोस्कोप, हायड्रॉलिक जॅक, रोबोट, चंद्राच्या कला, कम बॅक रोलर यासह अनेक प्रकल्प मुले स्वत: हाताने बनवतील व विविध प्रयोग करतील. रविवारी सकाळी ११ वाजता ‘फन सायन्स फॉर किड्‌स’ हा विनाशुल्क कार्यक्रम संडे सायन्स स्कूलच्या यू-ट्यूब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Giant Radio Pulses Detected by Pune GMRT From a Star Spinning 592 Times Per Second in a Major Astronomy Discovery
MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government
Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Marathi News Esakal
www.esakal.com