
निरगुडसर : पाच पिंप गुळवणी,पाच लाख पुऱ्या,सहाशे किलो कांद्याची चटणी हा महाप्रसाद बनवला जातोय आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात निमित्त आहे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा,उत्तर पुणे जिल्हातील सर्वात मोठ्या हनुमान जन्मोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गावातील साडेतीनशे कुटुंबातील महिला पुऱ्या लाटण्याचे तर पुरुष पुऱ्या तळण्याचे काम करतात ही पिढी जात महाप्रसाद बनवायची परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे.