

Pune University
sakal
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत घेतल्या जातात. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. ३१) विविध विषयांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र नाशिक जिल्ह्यात राष्ट्रपती यांचा दौरा असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विद्यापीठाने ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.