
पुणे : तुमच्या मोबाईलवरील पेटीएम केवायसीची मुदत संपली आहे. तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, असा मेसेज पाठवून एका नागरीकाच्या बँक खात्यातील 44 हजार रुपये अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन माध्यमाद्वारे काढले. शहरात या स्वरुपाच्या घटनामध्ये काही दिवसांपासून वाढ होत असल्याची सद्यस्थिती आहे.
याप्रकरणी योगेश शहा (वय ५५, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांचे पेटीएमवर खाते आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना मोबाईलवर पेटीएम अॅपची केवायसीची मुदत संपल्याचा मेसेज आला.
त्यानुसार त्यांनी मेसेजवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी शहा यांना क्वीक सपोर्ट अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार शहा यांनी ही प्रक्रिया केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये कमी झाले.
त्यानंतर काही वेळाने १० हजार आणि ९ हजार असे सर्व मिळून ४४ हजार रुपये ऑनलाईन माध्यमाद्वारे कमी झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.