

शेतीमाल तारण कर्जासाठी
वखार महामंडळाचे प्रयत्न
वखार पावतीवर सुलभ कर्जासाठी नियोजन
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : बाजारातील शेतीमालाच्या आवकेनुसार बाजारभावात चढ-उतार होत असतात. अनेकदा बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. ही जोखीम कमी करण्यासाठी शेतीमालाची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करून त्यावर तारण कर्ज सहज उपलब्ध करून देण्यासाठी वखार महामंडळाचे प्रयत्न सुरू असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.
वखार महामंडळात गेल्या आठवड्यात ‘स्केलिंग अप वेअरहाऊसिंग रिलिफ फायनान्स’ या विषयावर बैठक झाली. यावेळी महामंडळाचे सचिव दीपक शिंदे, जागतिक बँकेचे वरिष्ठ कृषी व्यवसाय तज्ज्ञ आदर्श कुमार, अमित अरोरा, अर्शिया गुप्ता तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दीपक शिंदे यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी ब्लॉकचेन आधारित धान्य तारण कर्ज योजनेची माहिती दिली. या माध्यमातून सुरक्षित साठवणूक करून वखार पावतीच्या आधारे सुलभपणे कर्ज उपलब्ध करून घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वखार पावतीवरील धान्य तारण कर्ज योजना अधिक सुलभ, प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्याबाबत दिवेगावकर यांनी सूचना केल्या. वखार पावतीच्या माध्यमातून शेतीमालाचे मूल्य सुरक्षित ठेवून त्यावर तारण कर्ज उपलब्ध झाल्यास आर्थिक गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना शेतीमालाची घाईघाईने विक्री करण्याची आवश्यकता कमी होईल. त्यामुळे योग्य बाजारभाव मिळेपर्यंत शेतीमाल राखून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
फोटो :
पुणे : वखार महामंडळाच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.