

पुणे, ता. ३ ः ‘‘भाषा हे माणसाकडे असलेले महत्त्वाचे साधन आहे. शब्दांमध्ये सामर्थ्य असून, महाराष्ट्रातील महापुरुषांना स्फुरण चढले ते मराठीतच; म्हणून भाषेने इतिहास घडविला, असे म्हणता येते,’’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तुषार कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. विद्या अवचट आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘भाषेतच आपली जडणघडण होत असते. शब्दांचा संबंध आपल्या स्वभावाशी असतो, म्हणूनच भाषा आपले व्यक्तिमत्त्वही घडवत असते. परकी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मराठीने आपले मराठीपण कधीही हरवू दिले नाही.’’ डॉ. मोहरील म्हणाले, ‘‘भाषा ही मनांना जोडणारी असावी. भाषेच्या मानवनिर्मित भिंती भेदून आपल्याला एकसंध समाजाच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.’’ डॉ. विद्या अवचट यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले, तर आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.