कोथरूडमधील कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन रखडले

कोथरूडमधील कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन रखडले
Published on: 

कोथरूड, ता. १५ ः कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडे घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छता विभागात ४७५ कंत्राटी पद्धतीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. या सर्व कामगारांचे माहे सप्टेंबर २०२६ चे वेतन अ‌द्याप अदा केलेले नाही. त्यामुळे या कामगारांना नवरात्रीचा सणदेखील साजरा करता आलेला नाही. दसरा-दिवाळी सणावरसुद्धा आर्थिक कोंडीचे सावट आल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे महापालिका कामगार युनियन मान्यताप्राप्तचे अध्यक्ष कॉ. उदय भट, कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे यांनी पुणे महापालिका आयुक्त यांना निवेदन देवून कंत्राटी कामगारांना तातडीने वेतन देण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. कंत्राटी कामगारांना महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयीन परिपत्रकानुसार २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर या दिवशी पूर्ण पगारी सुट्टी असूनसुद्धा त्यांच्या सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचे वेतन देखील दिले जात नाही. सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या कामगारांना दुप्पट दराने वेतन अदा करणे आणि एक पर्यायी सुट्टी देणे अपेक्षित असते. महापालिकेने काम दिलेल्या ठेकेदार संस्थेने कार्यालयीन परिपत्रकाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे, तसेच ठेकेदाराकडून निविदेच्या अटी-शर्तीचे पालन केले जात नाही. १० तारखेच्या आत वेतन देणे बंधनकारक असूनही कामगारांना उशिरा वेतन देण्याचे प्रकार वारंवार घडून येत आहेत. महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून संबंधित कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेत अदा करण्याविषयी सूचना द्याव्यात, असे निवेदनात नमूद केले आहे.
--------------------------------------
‘सकाळ’ने फोडली प्रश्नाला वाचा
एका कंत्राटी कामगाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आमच्या हक्काचे वेतन आम्हाला वेळेत मिळत नसल्याने आमची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. कौंटुबिक तणाव वाढला आहे. असमाधानकारक कामकाजाबद्दल या ठेकेदाराला वीस हजार रुपयाचा दंड नुकताच करण्यात आला होता. कामगारांना वेळेवर वेतन न देणे, प्रभागातील स्वच्छतेच्या कामातील त्रुटी यामुळे संबंधित ठेकेदाराबद्दल तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. ‘सकाळ’मध्ये आमच्या प्रश्नाला वाचा फोडली गेली. त्यामुळे वेतन मिळण्यास मदत झाली होती. आता पुन्हा हा प्रश्न आला आहे. महापालिकेने ठेकेदार बदलावा.
------------------------
संबंधित ठेकेदार कंपनीबाबत आमच्याकडे वारंवार तक्रारी येत आहेत. त्यांना करारानुसार काम करण्यास सांगितले आहे. ठेकेदाराला यासंदर्भात नोटीस काढणार आहोत.
- सुहास जाधव, सहाय्यक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com