
हडपसर : तुटलेली - फुटलेली कवले, सिमेंटसह रंग उडालेल्या भिंती, खिळखिळ्या झालेल्या खिडक्या, दरवाजे, भोवताली असलेले कचऱ्याचे साम्राज्य, सांडपाणी वाहिनीची दुरवस्था आणि घरात शिरणारे पावसाचे पाणी अशा परिस्थितीला येथील पालिकेच्या बंटर स्कूल आवारातील शिक्षक वसाहत तोंड देत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून त्याकडे गंभीर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या कुटुंबांना आरोग्य व सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे.