न्हावरे :निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे अवेळी पाऊस ; पंजाबराव डख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjabrao Dakh Patil
न्हावरे :निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे अवेळी पाऊस ; पंजाबराव डख

न्हावरे : निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे अवेळी पाऊस ; पंजाबराव डख

न्हावरे : मागील काही वर्षांपासून जंगलतोड (Deforestation) होऊन त्याजागी प्रदुषित कंपन्या त्याचबरोबर सिमेंटची जंगले उभी राहिली एकुणच निसर्गाचा ऱ्हास (Environmental degradation) होऊन समतोल बिघडल्यामुळे पूश्वीवरील तापमान वाढुन निसर्ग आता त्याचे रुद्ररूप दाखवू लागला आहे त्यामुळे अवेळी पाऊस व हवेतील वातावरण सातत्याने बदलत असल्याचे मत प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील (Meteorologist Punjabrao Dakh Patil)यांनी बोलताना व्यक्त केले.शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे सुनंदा ऍग्रो एजन्सीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा: चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

अध्यक्षस्थानी गुरूवर्य संभाजी(तात्या) पवार होते.श्री डख पुढे बोलताना म्हणाले की निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे पाऊस होतोय पण अलिकडच्या काळात ढगफुटी सारख्या(पावसाचे) प्रमाण वाढले आहे त्यामध्ये सुसुत्रतापणा आणायची असेल तर वुक्षरोपन करून झाडांची संख्या वाढवणे गरजेचं आहे .यावेळी डख पाटील यांनी शेतकऱ्यांना हवामानाबद्दल अचूक सल्ले आणि काही ठोकताळे सांगितले यावेळी शिवकुमार देशमाने,ज्ञानेश्वर ढवले,शामराव पवार, दादा पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शिरूर बाजार समितीचे संचालक सतिश कोळपे, न्हावरे तंटामुक्ती चे अध्यक्ष दिनेश दरेकर, बापुसाहेब काळे, राजहंस काळे, जयराम भगत,उपस्थित होते. प्रास्ताविक विकास पवार सूत्रसंचालन अनिल पवार आभार वैभव पवार यांनी मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top