मुंढवा - उपनगरात पडलेल्या पावसामुळे रस्त्याच्या सखल भागात पाणी साचले होते. तर मुंढवा केशवनगर कोरेगाव पार्कमध्ये भागात झाड उन्मळून पडणे व त्याच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार पाहायला मिळाले..कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट रोडवरील पॉप्युलर हाईटजवळ मौलाना अबूल कलाम आझाद स्मारकाजवळ रस्त्यावर झाड उन्मळून पडले. त्यात काही जीवीत किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र काही काळ रस्ता बंद झाला होता. नगरसेविका सुरेखा कवडे यांच्या कार्यकत्यांनी रस्त्यावरच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे वाहतुक सुरळीत होण्यास मदत झाली..मुंढवा पिंगळे वस्ती मेरिएट सुट जक्शन नॉर्थ नेन रस्ता दरम्यान चारचाकी वाहनावर झाड कोसळले.वाहनाचे नुकसान जीवितहानी नाही.केशवनगर येथील साडेसतरा नळी रेल्वे गेटजवळ झाडाची फांदी रस्त्यावर पडल्यामुळे, येथून जाणारी वाहतूक काही काळ बंद झाली होती. स्थानिकांनी जेसीबीच्या साह्याने फांदी दूर करून रस्ता मोकळा केला..पाणी कोठे साठले ?* कोरेगाव पार्क येथील मैलापाणी जलशुध्दीकरण केंद्रासमोर* पिंगळे वस्ती मेरिएट सुट जक्शन जवळ* पुनावाला पिनकोपसमोर* नॉर्थ मेन रोड कॉपा मॉल समोर* मुंढवा महाराजा सयाजीराजे गायकवाड चौकात* वडबन श्राकृष्ण सोसायटी समोर* महात्मा फुले चौक झगडे मिसळसमोर* महात्मा फुले चौक यापुढे बधे वस्ती बसथांब्यासमोर* रेल्वे उड्डाणपुलापुढे मुंढवा हद्दीत* खराडी येथील ब्रम्हा सोसायटीजवळ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.