Electricity Poll Collapse by Unseasonal Rain
sakal
पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने महावितरण चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्वभागातील गावांमधील विजेचे एकूण सुमारे ८० खांब उन्मळून पडल्याने अनेक वाड्यावस्त्यावरील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. महावितरण कडुन वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असल्याची माहिती निरगुडसर शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता नितेश भसारकर यांनी दिली.