आर्ट ऑफ लिव्हिंग पुरस्कार वितरण आज

आर्ट ऑफ लिव्हिंग पुरस्कार वितरण आज
Published on

‘अनसंग एव्हरीडे हिरोज’ पुरस्कारांचे आज वितरण
श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त फडकुले सभागृहात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : समाजासाठी पडद्यामागून निःस्वार्थ सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना ‘अनसंग एव्हरीडे हिरोज अवॉर्ड्स’ प्रदान करण्यात येणार आहेत. श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग, सोलापूर’तर्फे
सायंकाळी ६ ते ८ या वेळेत डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग’चे महाराष्ट्र अपेक्स मेंबर पांडुरंग शेळके यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच राजशेखर येळीकर, पेंटप्पा गड्डम, स्वाती माने, अंबादास कोंकती आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. या प्रेरणादायी सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग, सोलापूर’तर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com