Pune पानशेत येथील अज्ञात इसमाच्या खुनाचा उलगडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; वेल्हे पानशेत धरण परिसरातील

Pune : पानशेत येथील अज्ञात इसमाच्या खुनाचा उलगडा

वेल्हे : पानशेत धरण परिसरातील आंबेगाव बुद्रुक (ता. वेल्हे) येथील भागात अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून दिल्याचा प्रकार मंगळवारी (ता.१२) रोजी दुपारी उघडकीस आला होता.

रविवार (ता.१६) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने संबधित व्यक्तीच्या गुन्हेगारांस अटक केली आहे. राहुल प्रकाश रावत (वय२८ ) रा.इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी संजय बाबुराव कडू देशमुख (वय ३६) रा. कुरण बु.दत्तात्रय निवंगुणे (वय ४०) रा.आंबी दोघेही ता.वेल्हा जि. पुणे, तर धनंजय सदानंद ढमाले (वय ३२) रा.अथर्व आपार्टमेंट ,विठ्ठल मंदिर जवळ नवी पेठ ता.हवेली जि. पुणे, अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

पानशेत धरण परिसरातील पानशेत-शिरकोली रोडलगत आंबेगाव बुद्रुक गावच्या हद्दीत एक अनोळखी इसम मृत अवस्थेत पडलेला असून त्याचा मृतदेह कुजलेला होता. अवस्थेत होता यानुसार वेल्हे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी अज्ञात इसमानवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृत इसमास अत्यंत क्रूरपणे मारून त्याचे शीर धडावेगळे करून त्याचा डावा हात तोडून टाकलेला होता

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उगडकीस आणून आरोपी अटक करणे बाबतच्या सुचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सदर गुन्हाचा समांतर तपास करीत होते.

त्यानुसार पोलीस नाईक अमोल शेडगे यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की सदर चा गुन्हा हा संजय बाबुराव कडू देशमुख , धनंजय सदानंद ढमाले , गणेश दत्तात्रय निवंगुणे यांनी केला असल्याची माहिती मिळताच सदर आरोपी यांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीचे आधारे सोमेश्वरवाडी ता.हवेली जि.पुणे येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे अनुषंगाने माहिती विचारली असता त्यांनी गुन्हाची कबुली आरोपींनी दिली आहे.

सदर गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार व कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी वेल्हा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

सदरची कामगिरी ही .डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच मा.मितेश घट्टे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब ढोले उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहा फौजदार हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस नाईक अमोल शेडगे, पोलीस हवालदार दत्तात्रय तांबे, पोलीस नाईक बाळासाहेब खडके, पोलीस नाईक समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली.