
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले याबाबत पवार म्हणाले,' नागालॅंड येथे १२ जागा लढविल्या आणि तेथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८ उमेदवारांना विजयी करीत काम करण्याची संधी दिली.
Sharad Pawar : देशात आगामी निवडणूकांमध्ये बदल आणखी प्रखरशाने बघायला मिळेल
माळेगाव - केरळ, तामिळनाडूमध्ये भाजप येण्याची शक्यता नाही. तसेच अंद्रप्रदेश, हैद्राबाद, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशमध्ये भाजप नाही. आपल्याकडे शिक्षक-पदवीदर निवडणूकीसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि आता पार पडलेल्या पुणे व पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणूकीचे निकाल पहाता बदलाचे वारे वेगाने वाहू लागले आहे. अत्ताच ठोस निष्कर्ष काढणे योग्य नाही, परंतू आगामी निवडणूकांमध्येही बदल आणखी प्रखरशाने बघायला मिळेल अशी मला खात्री वाटते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकिय अंदाज वर्तविला.
बारामती-गोविंदबाग येथील आपल्या निवासस्थानी शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात पोटनिवडणूकांमध्ये महाविकास आघाडीला मिळत असलेले यश, राष्ट्रवादी पक्षाच्या नागालॅंडमध्ये निवडून आलेल्या ८ जागा, निवडणूक आयोगाबाबात सुप्रिम कोर्टाचा निर्णय, कांद्याचे पडलेले भाव आदी विविध मुद्यांच्या आधारे पवार यांनी यावेळी भाजप सरकारकाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले याबाबत पवार म्हणाले,' नागालॅंड येथे १२ जागा लढविल्या आणि तेथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८ उमेदवारांना विजयी करीत काम करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे नागालॅंडला राष्ट्रवादी पक्ष दोन नंबरचा पक्ष झालेला आहे. जो सत्ताधारी पक्ष आहे त्याचे सरकार बनेल. पण मान्यता प्राप्त विरोधी पक्ष याचे नेतृत्व हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे येईल. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र वर्मा त्यांना नागालॅंडला पाठविले आहे. पुढील दोन दिवसात ते तेथील सर्वांशी चर्चा करतील. तेथे काय आणि कसे करायचे, याची माहिती मला देतील आणि त्यानंतर मी निर्णय घेणार आहे. मी तेथील जनतेला धन्यवाद देतो त्यांनी मतदानाची चांगली टक्केवारी आमच्याबाजूने उभी केली.'
भाजप पक्षाचा पोटनिवडणूकीत पाडाव झाला असे विचारले असता पवार म्हणाले,' मला वाटते आता देशात बदलाचा सूर तयार होत आहे. पुण्याची निवडणूक काय सांगते, स्थानिक स्वरांज्य संस्था, शिक्षक-पदविधर निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये भाजपला एक दोन जागा सोडल्या तर इतर ठिकाणी त्यांना समाधानकारक यश मिळाले नाही. वास्तविक सरकार त्यांचे आहे. सत्तेचा पुर्ण वापर केला, हे जगजाहिर आहे.
कसबा कोणाचा होता आणि तेथील लोकांनी काय निर्णय घेतला. त्या पार्श्वश्वभूमिवर जनतेची भूमिका बदलाला अनुकूल आहे. एकूण निषकर्श काढणे योग्य नाही. पण देशातला ट्रेंड बघितले तर केरळ, तामिळनाडूमध्ये आज भाजप नाही आणि या दोन्ही ठिकाणी येण्याची शक्यता नाही. कर्नाटकमध्ये पुर्वी काँग्रेसचे राज्य होते. खासदार व आमदार फोडूननंतर भाजपचे राज्य तेथे आले. आंध्रप्रदेश आणि हैद्राबाद या दोन्ही ठिकाणी बघितले तर भाजप त्या ठिकाणी नाही.
तशीच स्थिती पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशात आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांमघ्ये बदल अपेक्षित आहे.' निवडणूक आयोगाबाबतच्या शंका आमच्या काही सहकारऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुप्रिम कोर्टाने बदल केला नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेताही त्या प्रक्रियेत आले आहेत. त्यामुळे हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिषय चांगला झाला आहे.' अशा शब्दात पवार यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले.
कांद्याच्या प्रश्नाबाबत पवारांची नाराजी...
शिंदे-फडणविस सरकार कांद्याचा प्रश्न सोडविण्यात कमी पडले आहेत. शेतकरी अपेक्षित भाव मिळत नसल्याने कांदा फेकून देत आहेत. या वाईट परिस्थिती सरकार निर्णय़ घेत नाही.आम्ही लोक सरकारमध्ये असताना कांद्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आम्ही त्यातून मार्ग काढत होतो. आम्ही कांदा खरेदी केला. नाफेडला खरेदी करायला लावला. मोठा अर्थिक बोजा आम्ही उचलाल. पण शिंदे-फडणविस सरकार अद्याप काहीही करत नाहीत, अशा शब्दात शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.