पुणे : खासगी रुग्णालयातील खाटांची संख्या डॅशबोर्डवर अपडेट करा

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने महापालिकेने त्यासाठी आरोग्य सेवापुरविण्यासाठी तयारी सुर केली आहे.
 Hospital bed
Hospital bedSakal
Summary

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने महापालिकेने त्यासाठी आरोग्य सेवापुरविण्यासाठी तयारी सुर केली आहे.

पुणे - शहरात रोज नव्याने दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण (Corona Infection) होत असल्याने खासगी रुग्णालयांनी (Private Hospital) त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णाला उपचार (Patient Treatment) नाकारू नयेत, तसेच रुग्णालयात किती खाटा (Beds) उपलब्ध आहेत याची माहिती विभागीय आयुक्तांच्या डॅशबोर्डवर (Dashboard) अपडेट करा असे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने महापालिकेने त्यासाठी आरोग्य सेवापुरविण्यासाठी तयारी सुर केली आहे. महापालिकेचे जम्बो रुग्णालय सुरू करण्यासाठीही आदेश दिले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजाराच्या पुढे गेली आहे. सध्या ८५ टक्के रुग्ण हे घरातच उपचार घेत आहेत. तर १५ टक्के रुग्ण दवाखान्यात दाखल झाले आहेत. हे प्रमाण सध्या कमी असले तरी पुढील काही दिवसात रुग्णसंख्या वाढत जाणार असल्याने खबरदारी घेतली जात आहे.

 Hospital bed
पुणे महापालिकेतील डॉक्टर भरती अडवली

शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, वैद्यकीय उपकरणे, आॅक्सिजन साठा, डॉक्टरसह इतर पुरेसे मनुष्यबळ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खासगी रूग्णालयांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवर आपल्या रूग्णालयात किती खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव आहेत, याचा दोन दिवसात पूर्ण भरण्यास सांगितले आहे. तसेच रूग्णालयातील खाटांच्या क्षमतेच्या किमान ८० टक्के केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात असे आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, महापालिकेच्या बाणेर कोवीड सेंटर, नायडू रुग्णालय, जम्बो रुग्णालय, दळवी यासह इतर ठिकाणी मिळून १८०० खाट आहेत. रुग्णसंख्या कमी असल्याने त्यापैकी ४०६ बेडचा वापर सुरू आहे.

‘शहरात १५० खासगी रुग्णालयांपैकी आज सुमारे ६० रुग्णालयांनी कोरोनासाठी खाटांची माहिती डॅशबोर्डवर अपडेट केली आहे. उरलेल्या रुग्णालयाकडेही पाठपुरावा सुरू आहे. खासगी रूग्णालयांनी स्वतः:हून खाटांची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध केली नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

- डॉ. मनिषा नाईक, सहाय्यक आरोग्य प्रमुख

महापालिकेकडील खाटांची सद्यःस्थिती

  • एकूण उपलब्ध खाट - १८००

  • सध्या उपलब्ध खाट - ४०६

  • व्हेंटिलेटर खाट - १३९

  • आॅक्सिजन - २२१

  • आयीसीयू खाट - ३०

  • व्हेंटिलेटरसह आयसीयू खाट - १६

  • दाखल रुग्ण - १८९

  • रिक्ता खाटा - २१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com