
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतील सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या पण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवू न शकलेल्या उमेदवारांनाही आता रोजगाराची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारचे विविध विभाग आणि बड्या खासगी संस्थांमध्ये त्यांना काम करता येईन. प्रत्यक्ष रोजगार प्रदान करणारी संस्था आणि संबंधित उमेदवार यांना परस्परांशी जोडण्याचे काम ‘प्रतिभा सेतू’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणार आहे. आधी केवळ ‘पब्लिक डिसक्लोजर स्कीम’ (पीडीएस) म्हणून ओळखला जाणारा हा प्लॅटफॉर्म आता कात टाकणार आहे.