esakal | Big Breaking : 'यूपीएससी' परीक्षेबाबत मोठा निर्णय; लॉकडाउनमुळे परीक्षा...!
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC

'यूपीएससी'ने यापूर्वी नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या मुलाखतींसह आर्थिक सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एनडीए आणि संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा या २०२० च्या परीक्षांचा समावेश यामध्ये आहे.

Big Breaking : 'यूपीएससी' परीक्षेबाबत मोठा निर्णय; लॉकडाउनमुळे परीक्षा...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील लाॅकडाऊन १७ मे पर्यंत वाढल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) ३१ मे रोजी होणारी 'यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०' पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन जाहीर केला. 'एमपीएससी'ने यापूर्वीच राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. इतर परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र, 'यूपीएससी'ने कोणताही निर्णय घेतला नव्हता. 

आणखी वाचा - घसा ओला करण्यासाठी तळीरामांची झुंबड, लॉकडाऊनचा फज्जा

'यूपीएससी'ने आज आढावा बैठक घेतली. त्यातल ३१ मे रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा रद्द केली. २० मे रोजी देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या परीक्षेची पुढची तारीख जाहीर केली जाईल. दरम्यान यूपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवावी. गेल्या सहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्यावा, या वाढीव दिवसांचा सदुपयोग करावा, असे आवाहन आयोगाने परिपत्रकात केले आहे. 

#Lockdown3.0 : घसा ओला करण्यासाठी तळीराम रस्त्यावर; दारुच्या दुकानांबाहेर लाबंच लांब रांगा

दरम्यान, 'यूपीएससी'ने यापूर्वी नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या मुलाखतींसह आर्थिक सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एनडीए आणि संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा या २०२० च्या परीक्षांचा समावेश यामध्ये आहे.

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top