

अर्बन बँक कर्ज घोटाळा
थकीत कर्जदाराचा जामीन फेटाळला
अहिल्यानगर, ता. ३१ ः नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) शाखेतून २२ कोटी रुपयांचे कर्ज घेणारा कर्जदार बबन निवृत्ती चव्हाण याचा नियमित जामीन अर्ज पिंपरी येथील न्यायाधीश के. के. वाघमारे यांनी फेटाळला आहे.
चव्हाण याने पिंपरी-चिंचवड शाखेतून २२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. गेल्या १०२ दिवसांपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
त्याच्यावतीने म्हणणे सादर करण्यात आले की, फॉरेन्सिक अहवालानुसार त्याच्याकडून ५ कोटी ७ लाख ४७ हजार रुपये वसुलीची जबाबदारी आहे. त्याने आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख रुपये भरलेले आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसेच, तो पुणे येथील कायमस्वरूपी रहिवासी आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्याने तपास पूर्ण झालेला आहे.
सरकार पक्षातर्फे म्हणणे सादर करण्यात आले की, चव्हाण याने कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली आहे. त्याआधारे २२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. आरोपीच्या बँक खात्यातून ही रक्कम अन्य खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली. या कर्ज घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार चव्हाण हाच आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने त्याचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेले आहेत.
कर्जाची व्याजासह रक्कम आता ७५ कोटी ७६ लाख ४० हजार ९९८ रुपये झाली आहे. सार्वजनिक पैशाची ही फसवणूक आहे. समाजाविरुद्धचा हा गंभीर गुन्हा आहे. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.