कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तत्काळ भरा

कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तत्काळ भरा
Published on

कृषी विद्यापीठातील
रिक्त पदे तत्काळ भरा

कृषी पदवीधरांना विविध विभागांत संधी देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : कृषी विद्यापीठातील सर्व संवर्गांतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय अनिवार्य करावा, कृषी पदवीधरांची शिक्षक म्हणून नियुक्ती करावी तसेच मृदा व जलसंधारण विभागाच्या आकृतिबंधात सुधारणा करून कृषी, कृषी अभियांत्रिकी व उद्यानविद्या पदवीधरांना पदे उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्यांचे निवेदन कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील स्पर्धा मंचच्या विद्यार्थ्यांनी दिले.
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ७० टक्के पदे रिक्त असून, जेमतेम ३० टक्के मनुष्यबळावर कामकाज सुरू आहे. त्यामुळे शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यावर परिणाम झाला आहे. छत्तीसगड, राजस्थान राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करून कृषी पदवीधरांची शिक्षक म्हणून नियुक्ती करावी. कृषी विषय व्यावसायिक असल्यामुळे बी.एड. पदवी अथवा इतर शैक्षणिक पात्रतेची अट ठेवू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
तंत्रकुशल मनुष्यबळ म्हणून मृदा व जलसंधारण विभागात कृषी पदवीधरांची निवड करावी. या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी स्पर्धा मंचतर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com