MP Supriya Sule : पाण्याच्या थकबाकी प्रश्‍नासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार

महापालिका व जलसंपदा विभागांतील पाणी प्रश्‍नावरील तिढा सोडविण्यासाठी सुळे साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद.
MP Supriya Sule

MP Supriya Sule

sakal

Updated on

पुणे - 'महापालिका व जलसंपदा हे दोन्हीही राज्य सरकारचेच विभाग आहेत. पाणी बिलाच्या थकबाकीवरून दोन्ही विभागांमध्ये अंतर पडले असून ते अयोग्य आहे. महापालिका आयुक्त व जलसंपदा विभागाशी बोलणे झाले आहे.

याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत मी पत्र पाठविणार आहे. दोन्ही विभागांनी आपापसात लढण्यापेक्षा एकत्र येऊन मार्ग काढला पाहीजे.' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com