MP Supriya Sule : खडकवासला धरणात येणाऱ्या दूषित पाण्यासंदर्भात तत्काळ डिपीआर तयार करा

खडकवासला धरणाच्या परिसरातील आस्थापनांमुळे धरणातील पाणी दूषित होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
mp supriya sule khadakwasla dam
mp supriya sule khadakwasla damsakal
Updated on

पुणे - 'खडकवासला धरणाच्या परिसरातील आस्थापनांमुळे धरणातील पाणी दूषित होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यासंदर्भात महापालिकेकडून कुठलीही खबरदारी घेतली जात नाही.

म्हणूनच पालकमंत्री व महापालिका आयुक्ता यांनी पुणे महापालिका, पुणे नवनगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व पुणे जिल्हा परिषद यांच्यामार्फत खडकवासला धरणासह जिल्ह्यातील धरणांच्या स्वच्छ पाण्यासंबंधीचा सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तत्काळ तयार करावा, हा आराखडा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यापुढे मांडू' असे खासदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सांगितले.

खासदार सुळे यांनी सोमवारी विविध विकास कामे, प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात विषयांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन, महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे, सचिन दोडके, काका चव्हाण यांच्यासह समाविष्ट गावातील नागरिक उपस्थित होते.

लष्करी संस्था, रिसॉर्ट, हॉटेल्स, गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट धरणामध्ये येऊनही महापालिका ठोस कारवाई करत नसल्याबद्दल तांबे, दोडके, चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच, गावांमधील रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेजच्या किरकोळ कामांसाठीही निधीची कमतरता असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

मेट्रो व समाविष्ट गावांच्या प्रश्‍नांबाबत सुळे म्हणाल्या, "मेट्रो सेवा ही घरापासून ते कार्यालयापर्यंत ये-जा करण्यासाठी सोईस्कर ठरली पाहिजे, प्रत्यक्षात तसे घडत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे पाच हजार बस तत्काळ खरेदी कराव्यात. मेट्रो यशस्वी होण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय होण्याची गरज आहे.

समाविष्ट गावांच्या मिळकत कराचा विषय गंभीर आहे. राज्य सरकारने निवडणुकीवेळी त्यावर स्थगिती दिली होती. आता मात्र सरकार ३४ गावांच्या मिळकत कराबाबत काहीच बोलत नाही. त्याबाबत सरकारने अचानक काही निर्णय घेतल्यास सामान्यांना फटका बसेल. या गावांमधील रस्ते, पाणी, वीज यांसारखे प्रश्‍न अद्यापही सुटलेले नाहीत.'

ट्रम्प यांच्या टेरिफ निर्णयाबाबत सुळे म्हणाल्या, 'केंद्राचा अर्थसंकल्प व फायनान्स याविषयी बोलताना मी अनेकदा टेरीफचा भारतावर परिणाम होईल हे सांगत होते. त्यानुसार मार्केटवर लक्ष ठेवा हे देखील सांगितले होते. ट्रम्प यांनी भारताला २६ टक्के टेरिफ आकारले आहे, सिंगापूरला १० टक्के टेरिफ आकारल्यानंतर त्यांच्या पंतप्रधानांनी त्याचा तीव्र निषेध नोंदविला. आपल्याकडे मात्र अद्याप काहीही घडलेले नाही.'

गोखले संस्थेची गळचेपी सुरू आहे

देशातील अर्थशास्त्रामध्ये गोखले इन्स्टिट्यूट ही नावाजलेली संस्था आहे. अजित रानडे यांचे देखील अर्थशास्त्रज्ञ म्हणून मोठे नाव व ओळख आहे. सरकारनेच रानडे यांच्यावर संबंधित संस्थेची जबाबदारी दिली होती. त्यानंतर आता सुरू झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. या संस्थेची सध्या गळचेपी केली जात असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

सुळे म्हणाल्या,

- टेरीफवरील चर्चा विरोधक म्हणून नव्हे, दर देशासाठी गरजेची

- नितीन गडकरी यांच्या सूचना देश व राज्याच्या हिताच्याच

- अनिल देशमुख यांच्या पुस्तकावर बंदी आणण्याची चर्चा सुरू आहे

- अजित पवार बारामतीबाबत बोलले असतील, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे

- रामदास तडस यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा प्रकार गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com