
Coldrif Syrup
Sakal
पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील नागरिकांना आणि औषध विक्रेत्यांना खोकल्यावरील ‘कोल्ड्रिफ सिरप’ या औषधाचा वापर तातडीने थांबवण्याचे आवाहन केले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपच्या सेवनानंतर काही मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.