नगर ः जलजीवन'' ची कामे तातडीने पूर्ण करा; अन्यथा गेट बंद करणार दहातोंडे यांचा जिल्हा परिषद प्रशासनाला इशारा

नगर ः जलजीवन'' ची कामे तातडीने पूर्ण करा; अन्यथा गेट बंद करणार  दहातोंडे यांचा जिल्हा परिषद प्रशासनाला इशारा
Published on: 

‘जलजीवन’ची कामे तातडीने
पूर्ण करा; अन्यथा गेट बंद करणार

संभाजीराव दहातोंडे यांचा जिल्हा परिषद प्रशासनाला इशारा

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : जिल्ह्यात जलजीवन योजनेला घरघर लागली आहे. अजूनही ८३० पेक्षा अधिक योजना अपूर्ण आहेत. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. झालेल्या योजनांचेही हस्तांतरण नाही. त्यामुळे प्रलंबित योजना पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी १७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेवर संबंधित गावचे सरपंच व ग्रामस्थ गेटबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, योजनेच्या कामांत अनियमितता करून निधीचा अपव्यय करणाऱ्या तत्कालीन सीईओ यांच्यावरही चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी दहातोंडे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
दहातोंडे यांनी मुख्य सचिवांना यांनी तक्रार दिली आहे. यात म्हटले आहे, की जिल्ह्यातील जलजीवन योजनांची कामे अपूर्ण आहेत. ९०० कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. भ्रष्टाचार आणि अनियमितता असल्याचेही आरोप आहेत. योजनेची झालेली कामे निकृष्ट आहेत. ठेकेदारांना कामे देताना वर्कडनचे बोगस दाखले जोडले आहेत. बीडकॅपेसिटी नसतानाही कामे दिली, त्यासाठी बनावट बीड कॅपेसिटी वाढवून दाखवली, निविदा प्रक्रियेत पात्र-अपात्रचा खेळ केला, मर्जीतील ठेकेदारांसाठी वर्क ईन हँडचे पत्र देऊनही अपात्र करणे, निविदा रिवोक करणे, रद्द करून परत करणे, निविदा नोटीसमधील अटी सोयीनुसार परस्पर बदलणे, निविदा उशीरा उघडणे, तांत्रिक लिफाफा विलंब करणे, ठेकेदारांचे बोगस कागदपत्रे जोडून कामे देणे, अशी गंभीर आरोप दहातोंडे यांनी केले आहे. जिल्हाभरातील जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत झालेल्या पाणी योजनेच्या कामांतही मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे, जलजीवनमधील अनियमिततेत आतापर्यंत दहा अधिकारी निलंबित केले आहेत. या कामांतून मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय झाला आहे. या सर्व प्रकाराला तत्कालीन सीईओ जबाबदार आहेत. त्यामुळे यांच्याकडून नाहक झालेला खर्च आणि निधीचा अपव्यय यांची चौकशी करून वसुली करावी व तत्कालीन सीईओ वर कारवाई करावी, अशी मागणीही दहातोंडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com