
खडकवासला: पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत आज ता. २७ जून सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १३.१६ टीएमसी म्हणजे ४५.१३ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी फक्त ३.५७ टीएमसी म्हणजे १२.२४ टक्के साठा होता. त्यामुळे यंदा चारपट अधिक पाणी साठले आहे.
धरण परिसरात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून, मागील २४ तासांत चारही धरणांमध्ये मिळून ४८७ दशलक्ष घनफूट इतकी नव्या पाण्याची आवक झाली आहे.