उरुळीवर चिकुनगुनिया, डेंगीचे सावट

मुसळधार पावसामुळे वातावरणात बदल; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
Dengue in the area with rashine
Dengue in the area with rashinesakal

उरुळी कांचन : मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. यामुळे पूर्व हवेलीतील (east haveli) उरुळी कांचनसह (urali kanchan) परिसरात चिकुनगुनिया (Chikungunya) व डेंगीचे (dengue) नवीन रुग्ण वाढत असल्याचे एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. मागील पंधरा दिवसांत डेंगीचे विविध रुग्णालयात रुग्ण आढळून येत आहेत. अगोदरच कोरोनाचा समावेश झाला आहे. त्यातच कोरोनापाठोपाठ डेंगीचा चोर पावलाने शहरात प्रवेश असून बाधितांची संख्या आढळून येत आहे. (Uruli kanchan area Chikungunya dengue fever patient Grow up)

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता डेंगीचा आजार उद्‌भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंगी नियंत्रणात असला तरी कोरोनाशी लढा देताना नागरिकांना डेंगीपासून देखील काळजी घ्यावी लागणार आहे. सध्याचे वातावरण हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे ‘व्हायरल इन्फेक्‍शन’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे व पावसामुळे साचून राहिलेल्या पाण्याच्या मार्फत सर्वत्र मलेरिया, डेंगीच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंगी व चिकनगुनियाच्या साथीत वाढ होताना दिसून येत आहे.

Dengue in the area with rashine
पुणे : भास्कर जाधवांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना जुलै महिन्यातच डेंगी व चिकूणगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे आहे. महामार्ग तसेच गॅरेजेसच्या ठिकाणी असलेले निकामी टायर्स, गरज नसलेले निकामी टायर्स, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदानी, फ्रिज, कुलर्सच्या ट्रेमध्ये स्वच्छता करण्यात यावी. तसेच नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आव्हान आरोग्य केंद्राकडून केले जात आहे.

Dengue in the area with rashine
पुणे : भरलेल्या बसमध्ये अंतर राखायचे कसे?

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. शहरात डेंगी व चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत, ही बाब जरी खरी असली, तरी नागरिकांनी घाबरून न जाता आजूबाजूचा परिसर व फ्रिजच्या पाठीमागे जमा होणारे पाणी काढून टाकावे. उरुळी कांचन ग्रामपंचायत यांच्याशी डेंगी व चिकुनगुनिया या संदर्भात बैठक झाली असून, लवकरच याविषयी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सोनवणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com