

CCTV captures two suspects carrying a sharp sickle after a ₹4.5 lakh house burglary in Uruli Kanchan
esakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात पांगारे वस्तीवरील दीपक गावडे यांच्या घरात शनिवारी (०८ तारीख) मध्यरात्री चोरट्यांनी हात सफाई करत सोने-चांदीचे दागिने रोख रक्कम असा सुमारे ४.५० लाखांचा ऐवज लंपास केला आहे.चोरट्यांनी दीपक संतोष गावडे वय २६ यांच्या राहत्या घराची लोखंडी ग्रील तोडून, दाराचा कडी कोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश केला व कपाट फोडून त्यामधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम पळवली.