

Uruli Kanchan Fire Station Project Delayed Despite PMRDA Approval and Fund Allocation :
उरुळी कांचन : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) उरुळी कांचन (ता.हवेली) येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यास दीड वर्षापूर्वी मंजुरी दिली.या केंद्रासाठी ११ कोटी ४ लाख २९ हजार ७६० रुपयांचा निधीही वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.मात्र,दीड वर्ष उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याने अग्निशमन केंद्र अद्याप कागदावरच असल्याचे चित्र आहे.पूर्व हवेलीत आगीच्या आणि अन्य दुर्घटनांच्या अनेक घटना घडत असताना,अग्निशमन केंद्र उभारणीला विलंब का? असा संतप्त सवाल दुर्घटनाग्रस्त व स्थानिक कार्यकर्ते विचारात आहेत.