

Police issue strict Ganeshotsav guidelines in Uruli Kanchan
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वतीने आज सायंकाळी शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांसह पोलीस पाटील,पत्रकार व शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी यावेळी मंडळांना आवश्यक सूचना दिल्या.गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी २० कलमी मार्गदर्शन जारी केले आहे.