Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ
Police conducted a route march in Uruli Kanchan ahead of Ganeshotsav to strengthen law and order and reassure citizens of their safety.

Police conducted a route march in Uruli Kanchan ahead of Ganeshotsav to strengthen law and order and reassure citizens of their safety.

Sakal

Updated on

सुनील जगताप , सकाळ वृत्तसेवा.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च, कायदा व सुव्यवस्थेवर भर.

उरुळी कांचन,ता.१४ :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वतीने गावात प्रभावी रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे व पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढवणे हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता.हा रूट मार्च उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथून सुरू झाला व पीएमटी चौक,आश्रम रोड,मणीभाई देसाई पतसंस्था,ग्रामपंचायत चौक,भैरवनाथ मंदिर,सटवाई चौक, एम.जी.व्ही रोड,तळवाडी चौक,पुणे-सोलापूर महामार्ग मार्गे पुन्हा पीएमटी चौक ते पोलीस स्टेशन असा गावातील महत्त्वाच्या चौक व वर्दळीच्या परिसरातून काढण्यात आला.पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक १, पोलीस उपनिरीक्षक ४, पोलीस अंमलदार १० तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांच्याकडील स्ट्रायकिंग फोर्सचे २० होमगार्ड असे एकूण ३५ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये व सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रूट मार्च काढल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी सांगितले.गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो ओळ : उरुळी कांचन गावातील मुख्य बाजार पेठेतून काढलेला पोलिसांचा रूट मार्च .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com