

उरुळी कांचन, ता. ११ : प्रशासक की सरपंच प्रशासक? या वादात गेल्या २६ तारखेपासून वाऱ्यावर सोडलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार अखेर शासन नियुक्त प्रशासकांच्या हाती आला आहे. त्यानुसार हवेली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मुदत संपलेल्या ४८ ग्रामपंचायतींवर शासन नियुक्त प्रशासकांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून पुढील सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे प्रशासक कामकाज पाहणार आहेत. ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार आणि विकासकामे सुरळीत राहण्यासाठी विविध विस्तार अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक होईपर्यंत ग्रामपंचायतींचे आर्थिक व्यवहार आणि विकासकामे या प्रशासकांच्या नियंत्रणाखाली राहतील.
संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवलेली गावे पुढीलप्रमाणे : जयश्री बाजीराव बेनके : लोणी काळभोर, उरुळी कांचन, सोरतापवाडी आणि वडकी. राजेंद्र तुकाराम सात्रस : बकोरी, भावडी, डोंगरगाव, केसनंद, थेऊर, शिरसवडी, तुळापूर आणि वढू बुद्रुक. पोपट चिमा केदारी : बिवरी, कोरेगाव मुळ, कुंजीरवाडी, खेड शिवापूर, नायगाव, न्हावी सांडस, प्रयागधाम, तांडे आणि वाकी. अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला : आंबी, डोणजे, गोऱ्हे खुर्द आणि खडकवाडी. नीलेश दत्तात्रेय धानापुने : आर्वी, गाडेखडसा, कोंढणपूर आणि मणेरवाडी. महेश पोपटराव वाघमारे : गोऱ्हे बुद्रुक, घोरपेसगाव, कुडजे आणि सोनापूर. हर्षल गौतम रोकडे : अष्टापूर, श्रीरामनगर, शिंदेवाडी आणि शिवापूर. राजेश जयराम निकम : मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, सांगणे आणि वरवडे. शकुंतला परमेश्वर चाटे : बहुली, हिंगणगाव, पेठ आणि सांगवी सांडस. प्रीती गणेश जगदाळे : आळंदी म्हातोबा, भवरापूर आणि शिंदवणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.