Pune Rural Bolero Gift: उरुळी कांचन ग्रामपंचायतीला कांचन कुटुंबाकडून बोलेरो जीप भेट; प्रशासकीय कामकाजाला मिळणार गती

उरुळी कांचन ग्रामपंचायतीला संतोष कांचन कुटुंबीयांकडून बोलेरो जीप भेट; स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रशासकीय कामकाजाला नवी गती
Kanchan family donates Bolero to Uruli Kanchan Gram Panchayat.

Kanchan family donates Bolero to Uruli Kanchan Gram Panchayat.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचे प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायतीला दिलेले चारचाकी वाहन, निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज गणेश कला क्रीडा केंद्रातील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.उरुळी कांचन येथील आबासाहेब पाटीलबुवा कांचन कुटुंबीयाच्या चक्रधर उद्योग समूहाचे संचालक तथा उरुळी कांचन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय कांचन, श्री चिंतामणी यशवंत साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन व माजी उपसरपंच संचिता कांचन यांच्या पुढाकाराने २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या उद्देशाने उरुळी कांचन ग्रामपंचायतीला "स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ" प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी "बोलेरो जीप" त्यांच्या शुभहस्ते प्रशासक मिलिंद जगताप व ग्रामपंचायत अधिकारी टी.एस.पाटील यांच्याकडे सुपूर्त करताना बोलत होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com