
उरुळी कांचन : येथील एका स्थानिक नागरिकाच्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाने बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने सदर नागरिकाने कोर्टाकडे धाव घेत ग्राम सचिवालय बांधकामावर न्यायालयाकडून स्थगिती आणली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने ग्राम सचिवालय बांधकाम पूर्ण करून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक विनोद शंकर माखीजा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.