

Legal Aid Camp Organized at Uruli Kanchan Gram Panchayat
esakal
सुनील जगताप
उरुळी कांचन,ता.१९ : ग्रामपंचायत उरुळी कांचन आणि एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने,तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (डालसा),पुणे यांच्या सहकार्याने बुधवार दि.१८ रोजी ग्रामपंचायत कार्यालयातील बैठक कक्षात कायदेशीर मदत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचे कायदेशीर हक्क,मोफत विधी सेवेच्या सुविधा आणि न्याय प्रक्रियेची माहिती "न्याय सर्वांसाठी हक्क प्रत्येकासाठी" या हेतूने मिळावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.