

Overview of Uruli Kanchan Special Gram Sabha
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतच्या नवीन कार्यालय इमारतीतील सभागृहात गोंधळात पंधरा मिनिटातच संपवली.उरुळी कांचन ग्रामपंचायतचा ग्रामसभा तहकूब करण्याचा किंवा गोंधळात उरकण्याचा इतिहास हा नवा नाही.त्या प्रथेला धरूनच आजची अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलवलेली ग्रामसभा दोन गटातील गोंधळामुळे आणि श्रेय वादामुळे अवघ्या पंधरा मिनिटात,विषय पत्रिकेवरील विषयांवर आणि बहुसंख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या समस्यांवर कोणतीही सखोल चर्चा न करता मंजूर मंजूरच्या घोषणेत संपली.