

Illegal weapons seized in Uruli Kanchan; ATS detains a wanted criminal with a country-made pistol, cartridges and sickles.
Sakal
सुनील जगताप
उरुळीकांचन : उरुळीकांचन-डाळिंब रोडवरील सदानंद बेकरी परिसरात गावठी पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी (दि.२७) ताब्यात घेतले.त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल,दोन जिवंत काडतुसे आणि दोन कोयते असा सुमारे ५१ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.भाऊसो उर्फ भावड्या भगवान महाडिक (वय ३४,सध्या रा.डाळिंब रोड,खुडे वस्ती,ता.दौंड; मूळ रा.शिंदवणे,ता.हवेली) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.