.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Historical Defacement: Holy Land of Mahatma Gandhi Gripped by Illicit Alcohol Cartels
उरुळीकांचन : पुण्यात विषारी दारुविक्रीने आतापर्यंत २२ जणांचा बळी गेल्यानंतर शहरात ग्रामीण भागातून हातभट्टी दारुची निर्मिती होऊन विक्री होत असल्याची बाब उघड झाली आहे. या दारुविक्री व पुरवठ्याला उरुळी कांचन परिसरातील कनेक्शन अनेक वर्षापासून उघड आहे.अवैद्य धंद्यांवाल्यांसोबत स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील पोलिस प्रशासनाच्या संबंधांतून या भागात राजरोसपणे अवैद्य हातभट्ट्या चालविल्या जात असून पुणे शहर तसेच स्थानिक गुत्यांवर या ठिकाणाहून हातभट्टी दारुपुरवठा सुरू आहे.