

उरुळी कांचन, ता. ६ : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील कंचन वृंदावन सोसायटीत भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देता सदनिका भाड्याने देणाऱ्या दोन घरमालकांवर उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे ग्रामीण एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी बुधवारी (ता. ५) ही संयुक्त कारवाई केली.
पुणे ग्रामीण एटीएसचे उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. अतुल आनंद कुलकर्णी (रा. कोथरूड) आणि सुरेश कृष्णाजीराव नाझरे (रा. कोरेगाव मूळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या घरमालकांची नावे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, घर भाड्याने देताना भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. मात्र, या दोघांनीही नियमांचे उल्लंघन केल्याचे एटीएसच्या तपासणीत निष्पन्न झाले. एटीएस पथकाने बुधवारी (ता. ६) सायंकाळी सातच्या सुमारास कंचन वृंदावन सोसायटीत तपासणी केली असता, कुलकर्णी आणि नाझरे यांनी भाडेकरूंची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात केली नसल्याचे आढळले. याप्रकरणी दोघांवरही ‘बीएनएस’ कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सोसायटीत संशयास्पद व्यक्तींचे वास्तव्य आहे का, या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. सहायक पोलिस फौजदार सस्ते पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.