

Mission Transformation activists guide residents in Bhawarapur on employment opportunities and alternative livelihood options.
esakal
अनिल जगताप ,
उरुळी कांचन, : यापूर्वी अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पांढरस्थळ,शिंदवणे,काळे शिवार आणि भवरापूर येथील कंजारभाट वस्त्यांमध्ये आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. उरुळी कांचन पोलिसांनी सतत कारवाई करून तेथील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद केल्यानंतर,आता तेथील नागरिक मजुरीकडे वळले असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली'मिशन परिवर्तन'राबविण्यात येत आहे.