Urali Kanchan News: उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाचे कार्य सर्वोत्तम; उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार

उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाच्या ८१व्या वर्धापन दिनी उपराष्ट्रपतींनी नैसर्गिक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
“आमच्या आनंदाचे रहस्य” हे पुस्तक प्रकाशन करताना उपराष्ट्रपती व मान्यवर .

“आमच्या आनंदाचे रहस्य” हे पुस्तक प्रकाशन करताना उपराष्ट्रपती व मान्यवर.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन :- महात्मा गांधींचा निसर्गाकडे चला,नैसर्गिक जगा व जगू द्या या विचारांची कास धरून उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रम कार्य करीत आहे ते आजच्या काळात सर्वोत्तम कार्य आहे असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केले ते उरुळी कांचन येथील महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा वर्धापन दिन रविवार दि.२२ मार्च २०२६ रोजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला त्यावेळी बोलत होते.या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा,राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह,महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे,आमदार ज्ञानेश्वर कटके व आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे मुख्य विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे,माजी आमदार अशोक पवार, के.डी.कांचन,माऊली कांचन,डॉ.अभिषेक देवीकर आदी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com