

9th National Naturopathy Day Celebrated at Uruli Kanchan Nature Cure Ashram
esakal
सुनील जगताप
उरुळी कांचन :- उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात ९ वा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने नैसर्गिक जीवनशैली आणि सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देणाऱ्या विविध आरोग्यदायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवाचा एक भाग म्हणून,सोरतापवाडी गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,ज्यामध्ये सुमारे १०० ग्रामस्थांनी सहभाग घेतला.या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण समुदायामध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे हा होता.