

Circular Economy Architecture: Introducing the E-Incentive 'Plastic Bank' Framework in Haveli
sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : उरुळी कांचन मधील १०० - १५० युवक एकत्र येवून पर्यावरण रक्षण व संवर्धनाबाबत वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी पुढे येत आहेत ही बाब अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी आज "माझे प्लास्टिक - माझी जबाबदारी" प्लास्टिक मुक्त घनकचरा व उरुळी कांचन या संकल्पनेतून ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनने सुरु केलेल्या 'प्लास्टिक बँक' या उपक्रमाचे लोकार्पण करताना केले. हा अभिनव उपक्रम उरुळी कांचन मध्ये आजपासून सुरु करण्यात आला,याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,हवेलीचे गटविकास शेखर शेलार,जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर,पंचायत समितीचे सदस्य सुदर्शन चौधरी,कोमल कांबळे,सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के.डी.कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.