Pune Uruli Kanchan Drug News: उरुळी कांचनमध्ये फ्लॅटवर धाड; ८७३ ग्रॅम गांजासह तरुण अटक, १६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Pune Drug Bust Youth held with 873g ganja seized in Uruli Kanchan flat raid : उरुळी कांचनमध्ये पोलिसांची धडक कारवाई; फ्लॅटवर छापा टाकून ८७३ ग्रॅम गांजा, डिजिटल वजनकाटा आणि एकूण १६ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Police Raid in Uruli Kanchan: Drug Peddler Arrested in Late-Night Operation

Police Raid in Uruli Kanchan: Drug Peddler Arrested in Late-Night Operation

sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे बेकायदेशीररीत्या गांजा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका तरुणास उरुळी कांचन पोलिसांनी जेरबंद केले आहे.या कारवाईत पोलिसांनी सुमारे १६ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी फिरोज महमद शेख (वय ३०, सध्या रा.स्वयंभु सोसायटी प्लॅट नं. ४०६ ढमढेरे कॉलनी,उरुळी कांचन ता.हवेली जि.पुणे मुळ रा.कदमवाकवस्ती ता.हवेली जि. पुणे) याला अटक केली आहे.याप्रकरणी पोलीस शिपाई सुमित वाघ यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की,उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती येथील ढमढेरे कॉलनीतील'स्वयंभू सोसायटी'च्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ४०६ मध्ये एक इसम गांजाची विक्री करत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीची गांभीर्याने दखल घेत,एका पथकाने

२३ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारांस पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.दरवाजा उघडल्यानंतर तिथे फिरोज शेख हा इसम मिळून आला.पोलिसांनी घराची झडती घेतली असता,घरात ८७३ ग्रॅम वजनाचा गांजा व डिजिटल वजनकाटा असा १६ हजार २१४ रुपयांचा गांजा व मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे,पोलीस हवालदार जगताप, प्रविण चौधर,निलेश जाधव,कमलेश होले, महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ आणि पोलीस शिपाई यादव यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com