Pune News: कॅनॉलच्या कठड्यावर लटकलेल्या चारचाकी गाडीतील चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी शिताफीने सुखरूप बाहेर काढले

Driver Rescued from Hanging Car: उरुळी कांचनजवळ कॅनॉलच्या कठड्यावर लटकलेल्या कारमधील चालकाला पोलिसांनी शिताफीने सुरक्षित बाहेर काढले.
Pune News

Pune News

esakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन,ता.१९ :चारचाकी गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून कॅनॉलच्या कठड्यावर लटकलेल्या चारचाकी गाडीतील चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी अत्यंत शिताफीने सुखरूप बाहेर काढले.शिंदवणे (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरात शनिवारी (ता.१९) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.यातून"खाकी वर्दीतील माणुसकी आणि तत्परता" काय असते याचा प्रत्यय आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com