Sant Tukaram Maharaj Palkhi received a grand welcome at Uruli Kanchan as thousands of Warkaris continued their spiritual journey towards Pandharpur.
Sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन :
आमुची आवडी पांडुरंगी ।
भजन कीर्तन वाडी संगी ॥
नाचू कीर्तनाच्या रंगी ।
ज्ञानदीप लावू जगी ॥
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगात न्हाऊन जात,संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरला जाण्यासाठी निघालेल्या, वारकऱ्यांच्या दिंड्या व लाखो वारकरी देह भान हरपून,"ज्ञानोबा~माऊली~तुकाराम"चा गजर करत दुपारी एकच्या सुमारास उरुळी कांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळ्यासह स्थिरावला.लोणी काळभोर वरून सकाळी सव्वा आठचा सुमारास निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे थेऊरफाटा, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ या ठिकाणच्या गावकऱ्यांनी मोठ्या भक्ती भावाने स्वागत करत,वारकऱ्यांना ठिकठिकाणी प्रवासात लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचे वाटप करत, अन्नदानाचाही लाभ घेतला.