Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

उरुळी कांचन महावितरण कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा ठिय्या; स्मार्ट मीटर सक्तीविरोधात लेखी निवेदन देत हवेली तालुक्यातील ग्राहकांवरील बंधन थांबवण्याची मागणी
Mahavitaran stated that smart meter installation is being implemented in accordance with the Electricity Act and aims to improve transparency, billing accuracy, and power distribution services.

Mahavitaran stated that smart meter installation is being implemented in accordance with the Electricity Act and aims to improve transparency, billing accuracy, and power distribution services.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : आज उरुळी कांचन येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.महेश धाडवे उपकार्यकारी अभियंता उरुळीकांचन यांच्या कार्यालयातील केबीन मध्ये ठिय्या आंदोलन करून स्मार्ट मीटर सक्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर, उरुळी कांचन शहर प्रमुख सचिन कांचन, उप तालुका प्रमुख अनिल कदम, युवासेना तालुका प्रमुख प्रकाश तुपे, अवधूत राऊत,सचिन दसुर,मयूर ननावरे,पुष्कर वनारसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com